वारसा जनसेवेचे ... प्रारंभ नवक्रांतीचा
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे, तेथे समाजसेवेचे अधिष्ठान असले पाहिजे.जो या मातीत जन्म घेतो,त्यांनाच या मातीशी बांधिलकी समजते. ज्याच्या नजरेत असते दूरदृष्टी, त्याचीच स्वप्ने सत्यात उतरतात.ज्याचे निश्चय कणखर असतात, तोच समाजात बांधिलकी टिकवतो. जो स्वतः आवाहने स्वीकारतो, तोच लोकांची समस्या दूर करतो. तो कधी थकत नाही, तो कधी थांबत नाही कारण परिवर्तनाची ज्योत त्याच्या मनात कायम तेवत असते. कर्तृत्ववान आणि चारित्र्यवान उमेदवार चांगल्याप्रकारे काम करू शकतो त्याचीच प्रचिती पै. सचिन बाबुराव पवार यांच्याकडे पाहिल्यावर येते. असे निस्वार्थी जीवन जगत यांनी समाजसेवेचं व्रत अंगिकारले आहे. ध्येय आणि तत्वनिष्ठ विचारप्रणाली चा मार्ग अनुसरत आत्तापर्यंत समाजकारणाची वाट चालवत आले आहेत. स्वार्थापेक्षा सेवा आणि त्यागाला जीवनात अग्रस्थान दिले. व्रतःस्थ वृत्तीने समाजहिताचे काम करण्यात धन्यता मानली.
काही आकडेवारी
आमच्या योजना
शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. मात्र आजही सर्वसामान्य जनतेची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात अशा अनेक शाळांमध्ये विविध सोयीसुविधांची आणि साधनांची कमतरता आहे. अशा परिस्थिती विद्यार्थ्यांना आवश्यकत्या बाबी न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. हीच बाब ओळखून पै. सचिन पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रातील ही दुरी दूर करण्यासाठी विशेष पाऊले उचलली. परिसरातील शाळांना. अगदी संगणकापासून वाद्य साहित्यपरेंत आणि शैक्षणिक साहित्यांपरेंत विविध गोष्टी स्वखर्चाने मदत म्हणून दिल्या.
दररोज दहा बारा कितीही वाढदिवस असो त्या प्रत्येकाला घरी जाऊन ही अनोखी भेट देऊन वसुंधरा जपण्याचा ध्यास पै. सचिन बाबुराव पवार यांनी घेतला आहे. त्यांच्या या पर्यावरणप्रेमी अनोख्या उपक्रमाची दखल विविध मान्यवरांनी,वृत्तपत्रांनीही घेतली असून त्यातूनच त्यांच्या उपक्रमाचे महत्व लक्षात येते. यापुढील काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरणाचा हा उपक्रम अधिक व्यापक, गतिमान करण्याचा धृढ निर्धार आहे.
आमचे लक्ष्य
पै सचिन बाबुराव पवार हे नेतृत्व करण्यास परिपूर्ण आहेत योग्य वेळेवर आणि खरी गरज असताना प्रत्येकाला आधार देऊन त्याची समस्या सोडविण्यात ते धन्यता मानतात. माणूस हा माणसाच्या कामाला आला पाहिजे अशी त्यांची धारण असते. त्यांच्या घरातूनच त्यांना समाजसेवेचे धडे मिळाले असल्याने ते आपले कर्तृत्व सिद्ध करण्यात सज्ज आणि पात्र आहेत. समाजाशी नाळ जोडली गेली असल्याने ते सतत इतरांसाठी जातात असतात.
थोडक्यात पण महत्वाचे
- वारसा जनसेवेचे ... प्रारंभ नवक्रांतीचा.
- फड गाजविले कुस्तीचे ..आता गड लढवितोय जनसेवेचे .
- ध्यास वसुंधरा जपण्याचा..त्यासाठी निर्धार वृक्षसंवर्धनाचा.
- दुःख पाहून दुसऱ्याचे मन हेलावून जाते .. ते दुःख दूर करणे कर्त्यव्य होऊन जाते.
- संत सेवेची पुण्याई ..तीच तर आहे मोठी कमाई.
- आदर कायद्याचा ..सदैव हात सहकार्याचा.
