आदर कायद्याचा ..सदैव हात सहकार्याचा ...
आपण ज्यांच्या बळावर आपल्या शहरात, गावात, घरात, सुरखीतपणे वावरतो त्या पोलीस दलाबाबत पै सचिन पवार यांची भूमिका नेहमी सहकार्याची राहिली आहे. प्रत्येक सुजाण नागरिकांप्रमाणे कायद्याचा आदर करून पोलिसांच्या ऑन ड्युटी २४ तास व्यापाची कल्पना त्यांना आहे. कोणताही उत्सव असो सण असो, मोर्चा आंदोलन असो, अशा परिस्थितीत ऊन, वर, पाऊस याची पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. स्वतःच्या हौसेमौजेला तिलांजली देऊन समाजाचे सण, उत्सव आनंदात पार पाडण्यासाठी ते राबत असतात. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेप्रती कृतज्ञता व्यक्त करत पै. सचिन पवार पोलीस दलालही नेहमी मदत करत असतात.
नागरिकांच्या सोयीसाठी पोलिसानं गरजेच्या गोष्टी भेट देण्यासोबत चांगल्या कामगिरीबद्दल पोलिसांच्या सत्कार ते करतात. पोलीस ठाण्याच्या आवारातही त्यांच्या अत्यन्त जिव्हाळ्याच्या अशा पर्यावरणाचा जागर करतात. न्यायची,कायद्याची कडी आणखी मजबूत व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न अखंडपणे चालू राहतील.
- उपक्रमाचे नाव:कायदा सुव्यवस्था
- संस्था:स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन, मल्हार प्रतिष्ठान






