शिक्षणाच्या वाटेवर व्हावा प्रत्येकजण समृद्ध...
शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. मात्र आजही सर्वसामान्य जनतेची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात अशा अनेक शाळांमध्ये विविध सोयीसुविधांची आणि साधनांची कमतरता आहे. अशा परिस्थिती विद्यार्थ्यांना आवश्यकत्या बाबी न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. हीच बाब ओळखून पै. सचिन पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रातील ही दुरी दूर करण्यासाठी विशेष पाऊले उचलली.
परिसरातील शाळांना. अगदी संगणकापासून वाद्य साहित्यपरेंत आणि शैक्षणिक साहित्यांपरेंत विविध गोष्टी स्वखर्चाने मदत म्हणून दिल्या. एखादी शाळा मोडकळीस आली असेल तर त्याची दुरुस्ती करून त्यावर नवे कोरे पत्रे टाकून देण्यासही त्यांनी मागेपुढे पहिले नाही. त्यांच्या या भूमिकेमुळेच या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर हसू फुलले आहे.
- उपक्रमाचे नाव:शैक्षणिक योगदान
- संस्था:स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन, मल्हार प्रतिष्ठान



