img
फेब्रुवारी २२, २०१४ पै. सचिन पवार
  • स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन
  • मल्हार प्रतिष्ठान

वृक्षसंवर्धन काळाची गरज

जंगलतोडीमुळे आणि सर्वत्र सिंमेट कॉक्रीटचे जंगले वाढल्यामुळे पर्यावरण प्रदुषण वाढत असून वृक्ष संवर्धन कमी व वृक्षतोड जास्त होत असल्याने जंगल कमी होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्लास्टिकशिवाय आपण जगूच शकत नाही, असेच चित्र आपणास सगळीकडे पाहावयास मिळत आहे. कारण बाजारात आपण कोणतीही खरेदी करा. त्याला पॉलिथीनशिवाय पर्यायच नसतो, ज्या भाजी विक्रेत्याकडे किंवा इतर माल विक्रेत्याकडे कॅरीबॅग नसेल तर आपण भाजीपाला घेणे सोडून पुढील दुकानात जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात सोबत कापडी पिशवी ठेवणेही आपणास सोयीचे वाटत नाही. त्यामुळे समस्येत अधिकच भर पडत आहे. तसेच पर्यावरणाविषयी समाजात जागरुकता निर्माण होणे गरजेच नाही तर काळाची गरज बनली आहे.

पूर्वजांना पर्यावरण शिक्षणाची गरज नव्हती. कारण त्यांना पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागेल याची जाणीव असल्याने ते आपल्या दारासमोर व शेताच्या बांधावर, विहीरीजवळ किंवा रिकाम्या जागेत झाडे लावत. मग या झाडांपासून जनावरांना आणि माणसानाही सावली मिळायची व शुद्ध प्राणवायू मिळायचा. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर लहान झुडपापासून ते फळे देणाऱ्या झाडांपैकी आंबा, जांभूळ, आवळा, सीताफळ, रामफळ, बोर, चिकू ही झाडे आवर्जून लावली जायची.

img
फेब्रुवारी २२, २०१४ पै. सचिन पवार
  • स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन
  • मल्हार प्रतिष्ठान

स्वच्छतेचे पैलू

अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकांदरम्यान युरोप आणि अमेरिकेतील धक्केदायक अस्वच्छ परिस्थितींमुळे त्या काळातील मिशनरी, ज्याला “स्वच्छतेचा धर्मोपदेश” म्हणता येईल तिचा प्रचार करत होते. या शिकवणीत घाणीची तुलना पापाशी करण्यात आली होती परंतु स्वच्छतेमुळे देवाच्या समीप जाणे शक्य होते असे सांगितले जात होते. कदाचित यामुळेच इंग्रजीतील “क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस” (अर्थात, स्वच्छता म्हणजे देवपण) हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.

लोक असाही तर्क करतात की, बाहेर जाऊन नोकरी केल्याने निदान दोन पैसे मिळवतात येतात, घरकाम किंवा साफसफाई करत बसण्यात काय लाभ? काहीच आर्थिक फायदा होत नसल्याने कशाला स्वच्छता राखण्याची चिंता करावी? यामुळे काही लोकांचे असे मत बनले आहे की, वैयक्तिक स्वच्छता पुरेशी आहे.