रक्षाबंधन आहे एका कुटुंबाला उभे राहण्याची व आधाराची भेट !!

आपल्या परिसरातील सौ.विद्या आत्माराम वानखेडे ताथवडे बापूजी वस्ती या ठिकाणी ५ वर्षापासून राहत आहेत तसे हे कुटुंब अकोला जिल्ह्यातील ता.रिसोड येथील कामाच्या निमित्ताने ते पिंपरी-चिंचवड ताथवडे या ठिकाणी आले. काम चांगले मिळाले असताना आचनक कोरोना सारखी भयंकर साथ आली व सर्व संपले.दिड वर्ष होत आले कोरोना मुळे दोघां पती-पत्नीची नोकरी गेली.परिस्थीती खुप बिकट झाली अशात त्याच्या लहान मुलीला डोक्याचा आजर असल्यामुळे डॉक्टरांनी पहिल्या नंतर डोक्यामध्ये गाठ झाली आहे ऑपरेशन केल्या शिवाय पर्याय उरला नाही. असे सांगितल्यावर हे कुटुंब पुर्ण घाबरून गेले. मदतीकरिता खुप फिरले काही नात्यातील लोकांनी थोडी फार मदत केली ऑपरेशन व्यवस्थित पार पडले.पण यापुढील खर्च व घरात अन्न धान्य नसल्यामुळे खुप अडचण निर्माण झाली.त्यानी जवळील काही महिला-भगिनी एकत्र येऊन सर्व परिस्थितीत सांगितल्यावर आज त्या कुटुंबाला १ महिना पुरेल इतके अन्न धान्य व गरजु वस्तु तसेच {५,५००} रूपये रोख रक्कम १ महिना डॉक्टरांनी तपासणी करिता बोलवले आहे.जाण्या येण्याचा खर्च तसेच औषधोपचारच्या खर्चाकरिता स्व.श्री.बाबुराव उर्फ आण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन च्या वतीने मदत केली गणरायाला हेच मागणे लवकर मुलीला बरे वाटु दे व घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलु दे!! खर तर उद्या रक्षाबंधन आहे एका कुटुंबाला उभे राहण्याची व आधाराची भेट !!

स्वतंत्र दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळा माळवाडी पुनावळे येथे ध्वजारोहण संपन्न

७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळा माळवाडी पुनावळे येथे ध्वजारोहण संपन्न करून भारतीय अमृतमहोत्सवी विशेष वत्कृत्व स्पर्धा पारितोषिक संमारभ १} उत्कृष विनोद बांगर २} श्रेया वानखेडे ३} संकल्प खाकळ. याचां कंपोस बाॅक्स व परिक्षा सहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच ६० विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला आणि शिक्षकांना रोप भेट देण्यात आले. यावेळी नगरसेविका श्रीमती.रेखाताई दर्शले,श्री.विजयभाऊ दर्शले.श्री.नितीनशेठ दर्शले,श्री.राजेशभाऊ दर्शले,श्री. अमितशेठ दर्शले,श्री.शेखर दर्शले,प्रणव दर्शले,श्री.विनोदसर बांगर मुख्याध्यापक व मित्र परिवार उपस्थित होते.

स्वतंत्र दिनानिमित्त श्रीमती:अनुसया ओव्हाळ उच्य माध्यमिक विद्यालय पुनावळे येथे ध्वजारोहण.

आज ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्त श्रीमती:अनुसया ओव्हाळ उच्य माध्यमिक विद्यालय पुनावळे येथे ध्वजारोहण करून इयत्ता १०वी तील विद्यार्थीनी कु.अनुजा लक्ष्मण ओव्हाळ हिचा प्रथम क्रमांक आला त्यानिमित्त सायकल भेट देऊन गौरविण्यात आले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.व विद्यालयातील शिक्षकांना रोप भेट देण्यात आले.या वेळी मुख्याध्यापक व शिक्षक आणि कर्मचारी व मित्र परिवार उपस्थित होते.

स्वतंत्र दिनानिमित्त नरसिंह विद्यालय ताथवडे येथे ध्वजारोहण.

आज ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्त नरसिंह विद्यालय ताथवडे येथे ध्वजारोहण करून इयत्ता १०वी तील विद्यार्थी कु.सुमित जयराम क्षीरसागर याचा प्रथम क्रमांक आल्या निमित्त सायकल भेट देऊन गौरविण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयातील शिक्षकांना रोप भेट देण्यात आले.या वेळी मुख्याध्यापक व शिक्षक आणि कर्मचारी व मित्र परिवार उपस्थित होते.

कु.मल्हार च्या वाढदिवसाचे औचित्य साधत ताथवडे-पुनावळे येथील स्वच्छता करणारे सर्व कर्मचारी याना गरजेच्या वस्तू वाटप करण्यात आले.

आज कु.मल्हार च्या वाढदिवसाचे औचित्य साधत होणारा खर्च टाळुन आपल्या ताथवडे-पुनावळे येथील स्वच्छता साफसफाई करणारे सर्व कर्मचारी,ड्रेनेज तसेच झाडलोट करणारे कर्मचारी,कचरा वाहतुक करणारे ड्राॅयव्हर व औषध फवारणी करणारे कर्मचारी यांना ३०हॅन्डग्लोज जोडी,६०मास्क,३०सॅनिटायझर,३०साबण, ३०प्रकारची विविध देशी फुलांची,फाळांची झाडे कुंडी सहित तसेच 12 महिला भगिनींना साडी वाटप करण्यात आले. या कोरोणा सारख्या भयानक संकट असताना सर्व कर्मचारी आपली जबाबदारी समर्थ पणे पार पाडत नागरिकांना कुठल्याही ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून आपले काम करत आहेत. सर्व कर्मचारी वर्गांला शुभेच्छा देतो.आणि आज आम्ही मल्हार प्रतिष्ठानाच्या वतीने या सर्व कर्मचारी व महिला भगिनींचा छानसा असा कौतुक सोहळा करण्यात आला. या वेळेस पै.सचिन बाबुराव पवार व मित्र परिवार उपस्थित होते.

कु.मल्हार च्या वाढदिवसाचे औचित्य साधत तालमीतील मातीला खाद्य देण्यात आल्या

कु.मल्हार च्या वाढदिवसाचे औचित्य साधत होणारा खर्च टाळुन आपल्या ताथवडे येथील तालमीत सराव करणाऱ्या मुलांची मागणी होती कि बरेच दिवस झालेत तालमीतील मातीला खाद्य पाहिजे जवळ जवळ दिड वर्ष झालेत कोरोणा मुळे मुलांचा व्यायाम तसेच कुस्ती सराव थांबला आहे.

आज घडीला तालमीत बरेच मुले सराव करत आहेत.यामुळे मातीला खाद्यची गरज होती म्हणून आज तालमीत एक तेलाचा डब्बा,५१ किलो लिबं,१ किलो कापूर,२ पोती काऊ,१५ किलो हळद,७ किलो दही तसेच सर्व मुलांना देशी फुलांची फळांची झाड लावणे व वाढवणे भेट म्हणून देण्यात आली.व वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा केला. तसेच मुलांनी चांगला सराव करून आपले नाव गावाचे नाव राज्य व देश पातळीवर गाजवावे ह्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस गावातील ग्रामस्थ व पै.सचिन बाबुराव पवार अणि मित्र परिवार उपस्थित होते.

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त थेरगाव, ताथवडे, चिंचवड येथील प्रसिद्ध डॉक्टर यांना भेटून शुभेच्छा देण्यात आल्या

आज जागतिक डॉक्टर दिनानिमित्त आकुर्डी येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर श्री.महेश पाटील सर, थेरगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री.गणेश जाधव सर, ताथवडे येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री.संतोष भालेराव सर, चिंचवड येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री.अमित कामत सर यांना भेटून शुभेच्छा देण्यात आल्या.

आज कोरोना सारख्या भयानक संकट असताना आपली सेवा अखंडितपणे चालु ठेवुन अनेक लोकांचे प्राण वाचवुन देवानंतर आपण ज्यांना पृथ्वीवरील दुसरे देव मानतो अश्या सर्व डॉक्टरनां खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक-पै.सचिन बाबुराव पवार व मित्र परिवार.

भोर तालुका येथील श्री:स्वामी समर्थ मंदिरास भाविकांना बसण्यासाठी व सभामंडपाकरिता देणगी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुका शहरालगत येथील श्री:स्वामी समर्थ मंदिरास व स्वयंभु महाशिवलिंग गाभाऱ्यात असणार्‍या येथील मंदिरास १२ मार्च २०२१ रोजी दर्शन घेऊन तसेच स्वामी सेवक श्री.मुकुंद रायरीकर काका व त्याचे बंधु मयुरेश रायरीकर तसेच ट्रस्ट चे बापु जगताप यांनी मंदिराची सर्व माहिती सांगितली. सध्या शंकर महाराज मठाचे बांधकाम सुरू आहेत.स्व.बाबुराव उर्फ आण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन व मल्हार प्रतिष्ठान यांच्यावतीने येथे येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी व सभामंडपाकरिता देणगी म्हणून पै.सचिन बाबुराव पवार यांच्याकडून पत्रे देण्यात आले. तसेच मंदिराच्या परिसरात सर्व बाजूनी २५ वडाची,पिंपळाची,बेलाची,कडुलिंबाची,नाराळाची आणि चिकुची व काही फुलांची व आयुर्वेदिक आशी ५१ रोपे भेट म्हणून देण्यात आली.यावेळेस मित्र परिवार तेथील स्थानिक भक्त उपस्थित होते.

!! श्री.स्वामी समर्थ जय जय श्री.स्वामी समर्थ !!

छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंतीनिमित्त १५,०००/- रुपयाचा स्वराज्य निधी

मल्हार प्रतिष्ठान संस्थापक मा श्री पै. सचिनभाऊ बाबुराव पवार ताथवडे, यांनी राजगड संवर्धनासाठी रु१५०००/- रुपयेचा स्वराज्य निधी अर्पण केला. दुर्गराज राजगडावरील बालेकिल्ला, गुंजवणेचे २ प्रवेशद्वार, आळु दरवाजा येथे शिवतीर्थ रायगडाच्या प्रवेशद्वारासारखेच सागवानी द्वार बसविण्यात येणार आहे. यावेळी त्याच्या सर्व टिमला रोप भेट म्हणून देण्यात आले. स्वराज्याच्या कामाकरिता छोटीशी मदत सह्याद्री प्रतिष्ठान यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

जेष्ठ नागरिकांना ३० देशी प्रकारची फळांची व आयुर्वेदिक झाडे भेट

आमचे मित्र चिंचवड गाव येथील युवा उद्योजक श्री.योगेशशेठ मोरे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तसेच जेष्ठ नागरिक यांना ३० देशी प्रकारची फळांची व आयुर्वेदिक झाडे भेट म्हणून देण्यात आली. शुभेच्छुक-पै.सचिन बाबुराव पवार व मित्र परिवार.

प्रजासत्ताक दिन

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ताथवडे येथील जि.प. प्राथमिक शाळा येथील ध्वजारोहण करण्यात आला,वर्ष भर शाळा चालु नसल्यामुळे 27-1-2021पासून प्रथमच सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जोश दिसला हा जोश आणि आनंद असाच टिकावा म्हणून कोरोणा सुरक्षेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना 15 लीटर सॅनिटायझर 2 ऑक्सिमीटर 2 Temperature Gun असे सर्व साहित्य स्व.बाबुराव उर्फ आण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन,मल्हार प्रतिष्ठान च्या वतीने भेट म्हणून देण्यात आले.कोरोना पार्श्वभूमीवर थोडेच विद्यार्थी उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक,शिक्षक गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बंधु भगिनीवर्ग व मित्र परिवार उपस्थित होते.

73 वा इंडियन आर्मी दिवस

"73 वा इंडियन आर्मी दिवस" सोल्जर युथ फाऊंडेशन च्या वतीने चिंचवड या ठिकाणी संपन्न झाला.यावेळी आर्मी चे विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.२५० शाळकरी मुलांचे या वेळी संचलन झाले. फाऊंडेशन चे अधीकारी मा.सैनीक तुषार कदम,मा.सैनीक रामदास मदने,मा.सैनीक अशोक जाधव,मा.सैनीक रघुनाथ सावंत,मा.सैनीक अशोक कोरटकर या सर्व मा.सैनीकांनी ह्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांच्या कडून आपणास सन्मानचिन्ह चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना आपल्याकडून भेट म्हणून वृक्ष ही भेट म्हणून देण्यात आले.कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केलेला त्याबद्दल आयोजकांचे आभार आणि त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.व त्यांनी पुढील काळात आपल्याकडून सहकार्य झाले पाहिजेत हि मागणी करण्यात आली आम्हि त्यांना सांगितले कधीही तयार आहोत. !! जय हिंद !!

73 वा इंडियन आर्मी दिवस

"73 वा इंडियन आर्मी दिवस" सोल्जर युथ फाऊंडेशन च्या वतीने चिंचवड या ठिकाणी संपन्न झाला.यावेळी आर्मी चे विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.२५० शाळकरी मुलांचे या वेळी संचलन झाले. फाऊंडेशन चे अधीकारी मा.सैनीक तुषार कदम,मा.सैनीक रामदास मदने,मा.सैनीक अशोक जाधव,मा.सैनीक रघुनाथ सावंत,मा.सैनीक अशोक कोरटकर या सर्व मा.सैनीकांनी ह्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांच्या कडून आपणास सन्मानचिन्ह चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना आपल्याकडून भेट म्हणून वृक्ष ही भेट म्हणून देण्यात आले.कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केलेला त्याबद्दल आयोजकांचे आभार आणि त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.व त्यांनी पुढील काळात आपल्याकडून सहकार्य झाले पाहिजेत हि मागणी करण्यात आली आम्हि त्यांना सांगितले कधीही तयार आहोत. !! जय हिंद !!

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली.

ताथवडे गावातील अंगणवाडी येथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून साजरा करण्यात आला. तसेच अंगणवाडीतील विद्यार्थी आणि शिक्षकांना वृक्ष भेट देऊन गौरविण्यात आले.यावेळेस ताथवडे गावातील महिला भगिनीवर्ग आणि सर्व मित्र परिवार उपस्थित होते..

मदत नव्हे कर्तव्य.

आपल्या परिसरातील ताथवडे अशोक नगर भागातील श्री.सचिन हुंडे हे चार ते पाच महिन्यांपासून आजारी असल्याचे मित्र परिवार व त्याच्या आईने फोन करुन सर्व परिस्थिती सांगितली म्हणून आज सचिनची प्रत्यक्ष भेट घेतली भेटीत असं कळालं कि त्यांस कॅन्सर झालाय.वडील तीन वर्षापूर्वीच वारले आहेत घराची आणी परिवार ची सर्व जबाबदारी सचिनच्या अंगावर पडली आजच्या या कोरोणाच्या काळात त्याची नोकरी ही गेली. आणी यातच त्याचवर आणखी एक भयानक संकट मागे उभे राहिले.त्याच्या मागे आई,पत्नी,दोन मुले आहेत.अशा वेळेस सर्व बिघडत चालेल आहे.या प्रसंगी आपल्याकडून फुल न फुलाच्या पाकळी सहकार्य म्हणून स्व:श्री.बाबुराव उर्फ आण्णासाहेब पवार सोशल फाऊंडेशन यांच्या तर्फे (११,०००) रूपये रोख रक्कम स्वरूपात व एक महिन्याचा किराणामाल भरून देण्यात आला.हि मदत त्याला व त्याच्या कुटुंबाला पुरेशी नाही पण त्यांना नक्कीच आधार देणारी राहील. यापुढील काळात पुन्हा काही या कुटुंबाला मदत लागली तर नक्कीच करण्यात येईल समाजाची परिस्थिती खूप अवघड होत आहे,सर्वांनीच एकत्र येऊन एकमेकांना आधार देण्याची गरज आहे.काळ कठीण जात आहेत पण उभे राहणं तितकेच महत्त्वाचं आहे.

!!! नरसिंह महाराज व म्हातोबा चरणी हिच प्रार्थना सचिन लवकर बरे होवो !!.

WMO कडून सन्मान

WMO कडून आलेल सन्मान पञ पाहुन खुप आनंद वाटला. नवीन ऊमेद,नवीन ऊर्जा देणारी गोष्ट घडली आहे. आजपर्यंत समाजात काम करत असताना विविध सामाजिक कार्य चालू आहेत.तसेच यापुढील काळात सतत काम करत राहणार आहोत.आज जगावरती कोरोना सारख्या भयानक आजारामुळे लोकांची परिस्थितीत खूप बिघडली आहे अशा वेळेस समाजात लोकांपर्यंत पोहचन त्यांच्या अडचणी सोडावून मनाला समाधान वाटले हे सर्व पाहून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन टिमने जे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले पाहून आनंद झाला.संघटनेचे महेश गव्हाणे सर,प्रवीण पिसाळ सर,जितेंद्र पवार सर असो आणि आपल्या सर्व वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO) च्या संपुर्ण टिमचे मनापासून धन्यवाद

मदत नव्हे कर्तव्य.

भारतात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांची अडचणीची वाईट वेळ आली आहेत रोजगार बुडाला आहे.त्यांच्यापुढे एक-एक दिवस आवघड जात आहे आशा वेळेस त्याना आपल्या सर्वांनी थोडीशी मदतीची अपेक्षा!उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.माणुसकि जपत एक जबाबदारी म्हणून ताथवडे येथील संत श्री.गोरोबाकाका कॉलनी येथील व बापूजी बुवा वस्ती वरिल काही कुटुंब यांना भेटून मदत केली या वेळेस पै.सचिन बाबुराव पवार व मित्र परिवार उपस्थित होते.यांच्याकडून काही गरजु कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुंचे किट कमीत-कमी पंचवीस ते तीस दिवस पुरेल इतके वाटप करण्यात आले.कोरोना व्हायरसच्या या लढाईत मी सदैव तुमच्या सोबत आहे.काळजी घ्या.

मदत नव्हे कर्तव्य.

आपल्या सर्वाची जबाबदारी आपल्या बांधवांसाठी...!

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला आहे.त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्य म्हणून ताथवडे येथील संत.श्री गोरोबाकाका कॉलनी मध्ये पै.सचिन बाबुराव पवार व मित्र परिवार उपस्थित होते.यांच्याकडून काही गरजु कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुंचे किट घरपोच वाटप करण्यात आले कोरोना व्हायरसच्या या लढाईत मी सदैव तुमच्या सोबत आहे.काळजी घ्या...

मदत नव्हे कर्तव्य.

कोरोनाचे विषाणूचे संकट वाढत असून भयानक होत असल्याने संपर्ण देशात लॉकडाऊन आहे पण सरकार परिस्थितीत चांगली होण्याकरिता लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे परिस्थीती खुप खराब होत आहेत.यामुळे काही कुटुंबातील प्रसंग अवघड झाला आहे.कुणालाही घराबाहेर निघता येत नसल्याने ज्यांचे पोट हातावर आहे. अशा या कुटुंबातील लोकांनी भेटून त्यांची अडचण सांगितली,दोन-तीन दिवस झालेत लहान मुलांना दुध मिळाले नाही,दुसरे कुटुंब दवाखान्यात पत्नीला घेऊन जाण्याकरिता पैसे नाहीत.व अजुन एक कुटुंब अक्षरशःखायलाच अन्न नाही ते कुटुंब बिहारी आहे अशी वेळ कोणावरही येऊ नयेत त्या ठिकाणी जाऊन अशा कुटुंबांना एक फुल न फुलांच्या पाकळी सहकार्य म्हणून पै.सचिन बाबुराव पवार व मित्र परिवार यांच्या वतीने ताथवडे गावातील पवार वस्ती बीआरटी रोड येथील गरजू कुटुंबाना अशा जीवनावश्यक असणाऱ्या विविध वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.तसेच अजुन काही कुटुंबातील लोकांना छोटीशी आर्थिक मदत देण्यात आली.हि मदत करत असताना या ठिकाणाहून जाणाऱ्या रिक्षाचालकाने सांगितल साहेब काही तरी मदत करा घरी बायको व मुले मी काही तरी घेऊन येईल आशी वाट पाहत आहेत हि आमची छोटीशीच मदत त्यांना नक्कीच आधार देईल...

महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल-रूक्मिणि चरणी हिच प्रार्थना हे संकट लवकर दुर होवो.

मदत नव्हे कर्तव्य.

कोरोनाचे विषाणूचे संकट दिवसेंदिवस भयानक होत असल्याने संपर्ण देशात लाॕकडाऊन करण्यात आला आहे.कुणालाही घराबाहेर निघता येत नसल्याने ज्यांचे पोट हातावर आहे,त्यांना याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे.अशा १० कुटुंबांना एक मदतीचा हात म्हणून पै.सचिन बाबुराव पवार व स्व.श्री.बाबुराव उर्फ आण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन यांच्या वतीने ताथवडे गावातील (नरहरी काॅलनी)येथील गरजू कुटुंबाना तांदुळ,गव्हाचे पीठ,डाळ, हळद,मसाला तेल,साखर,मिरची,साबण,कोलगेट अशा जीवनावश्यक असणाऱ्या विविध वस्तूंचे १० किट वाटप करण्यात आले,आपण ही समाजाचे काही देणं लागतो ह्या उद्देशाने ही मदत करण्यात आली. प्रत्येक गरजू कुटुंबाना मदत देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहचु शकत नाही ज्याला जे शक्य होईल तशी मदत करून देशसेवेत सहभाग घ्यावा यावेळी हभप.प्रमोद महाराज पवार,श्री.ईश्वर फरताळे,श्री.बंद्रीनाथ पांढरे,आकाश शिंदे,निलेश जाधव तसेच ताथवडे येथील मित्र परिवार उपस्थित होते.

मदत नव्हे कर्तव्य.

भारतात कोरोनाचे विषाणूचे संकट ओढवले असल्याने संपर्ण देशात लाॕकडाऊन करण्यात आला आहे. कुणालाही घराबाहेर निघता येत नसल्याने जवळ जव ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांना याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. अशा २२ कुटुंबांना एक मदतीचा हात म्हणून पै-श्री.सचिन बाबुराव पवार, श्री.अनिकेत पाडुरंग नवले यांनी पुढाकार घेऊन ताथवडे गावातील गरजू कुटुंबाना तांदुळ,पीठ,डाळ, हळद, तेल,साखर,मिरची,साबण,कोलगेट अशा जीवनावश्यक असणाऱ्या विविध वस्तूंचे २२ कुटुंबाला वाटप करण्यात आले,आम्हाला अभिमान आहे आम्ही भारत देशात राहतो कुठलीही जात-पात न पाहता प्रत्येक गरजू कुटुंबाना मदत देण्याचा आमचा संकल्प असून ज्याला जे श्यक्य होईल तशी मदत करून देशसेवेत सहभाग घ्यावा यावेळी श्री.राजुशेठ पवार श्री आकाश नवले,श्री ईश्वर फरताळे,संतोष गायकवाड,अक्षय नवघणे,गणेश शिंदे, साबळे पोलीस, चव्हाण सर,गजमोल सर ,गणेश लिंगाडे, वाघूले सर तसेच समस्त ताथवडे गावातील मित्र परिवार उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त "जागृती अंध मुलींची शाळा,आळंदी" येथे शाळेच्या नवीन इमारतीसाठी मदत.

शिवजयंती निमित्त स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब पवार सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने "जागृती अंध मुलींची शाळा,आळंदी" येथे शाळेच्या नवीन इमारतीसाठी एक आपलाही खारीचा वाटा म्हणून शाळेला २ ब्रास फरशी करिता देणगी देण्यात आली.तसेच विद्यालयतील १०० विद्यार्थीनीना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे महासचिव दत्तात्रय जाधव सर मुख्याध्यापिका मंगल वानखेडे मॅडम विद्यार्थीनी,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते.

श्री.बापदेव महाराज प्राथमिक शाळा क्रं.९६ (पिं.चिं.मनपा) किवळे येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ पै.सचिन बाबुराव पवार व स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब पवार सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने श्री.बापदेव महाराज प्राथमिक शाळा क्रं.९६ (पिं.चिं.मनपा)किवळे येथील विद्यार्थ्यांना हल्दीराम काॅर्न स्टिक ची ४०० पाकिटांचे वाटप व शाळेसाठी १८ झाडांच्या कुंड्या भेट देण्यात आल्या. शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ पिं.चिं.अंगणवाडी क्रं.(१०३)येथील मुलींना सबिस्को केक खाऊची पाकिटे देण्यात आली.

स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ पै.सचिन बाबुराव पवार व मल्हार प्रतिष्ठाण यांच्या वतीने पिं.चिं.अंगणवाडी क्रं.(१०३)येथील मुलींना सबिस्को केक खाऊची ७५ पाकिटे देण्यात आली. पि.चिं.महानगरपालिका शाळा क्रं.१०३(मुले)येथील विद्यार्थीना हल्दीराम आलु भुजिया खाऊची ४०० पाकिटे देण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग व अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होते.

जि.प.प्राथमिक शाळा,जांबे येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ पै.सचिन बाबुराव पवार व मित्र परिवार यांच्या वतीने जि.प.प्राथमिक शाळा,जांबे येथील विद्यार्थ्यांना १५० हल्दीराम सोया स्टीकची पाकिटे देण्यात आली. तसेच रसिकवाडी,जांबे येथील अंगणवाडीतील मुलांना ३० हल्दीराम चाॅकलेट ची पाकिटे वाटप करण्यात आले. शाळेतील मुख्याध्यापिका,शिक्षक वर्ग व अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या.

पिं. चिं.महानगरपालिका शाळा माळवाडी,पुनावळे येथील शालेय स्पर्धामध्ये विजेत्या ११ विद्यार्थ्यांना स्मृती चषक व स्कुल बॅग भेट देण्यात आली

स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ पै.सचिन बाबुराव पवार व स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब पवार सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने पिं. चिं.महानगरपालिका शाळा माळवाडी,पुनावळे येथील शालेय स्पर्धामध्ये विजेत्या ११ विद्यार्थ्यांना स्मृती चषक व स्कुल बॅग भेट देण्यात आली.तसेच १५० सबिस्को केक चे वाटप करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक व पालक वर्ग आणि सहकारी उपस्थित होते.

नरसिंह विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ

स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ पै.सचिन बाबुराव पवार व मित्र परिवार यांच्या वतीने नरसिंह विद्यालयातील इ.८वी,सुमित जयराम क्षीरसागर प्रथम क्रमांक आल्याबद्दल चषक व शैक्षणिक साहित्य(कंपोसबाॅक्स),इ.९ वी तृप्ती पिंटु डोंगरे प्रथम क्रमांक आल्याबद्दल चषक व शैक्षणिक साहित्य(फेलरपेना सेट),इ.१० वी प्रविण बाळासाहेब यादव प्रथम क्रमांक आल्याबद्दल चषक व शैक्षणिक साहित्य(अप्सरा पेन सेट)व सर्व शालेय विद्यार्थीना हल्दीराम चिक्की च्या २२ बाॅक्स खाऊचे वाटप तसेच १२ फुलांची व आयुर्वेदीक रोपे भेट देण्यात आली. शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व सहकारी उपस्थित होते.

पिं.चिं.मनपा शाळा क्रं.१०३(मुलीची)पुनावळे येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.

स्व.बाबुराव ऊर्फ आण्णा साहेब लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ पै.सचिन बाबुराव पवार,मल्हार प्रतिष्ठान यांच्या वतीने पिं.चिं.मनपा शाळा क्रं.१०३(मुलीची)पुनावळे येथील विद्यार्थ्यांना हल्दीराम खंट्टामिठा चिवड्याची ४०० पाकिटे देण्यात आली,तसेच अंगणवाडी क्रं.१०३(मुले)पुनावळे गावठाण येथील मुलांना सबिस्को केक ७५ पाकिटे देण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग व अंगणवाडी येथील शिक्षिका उपस्थित होते.काम करत आहोत करत राहू ...