संत सेवेची पुण्याई ..तीच तर आहे मोठी कमाई..!

श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी समीप असलेला आपला सारा परिसर. त्यामुळे संतांचा वारकऱ्यांचा सहवास या परिसराला लाभला. वारकरी संप्रदायाची पताका अभिमानाने मिरवणाऱ्या पवार कुटुंबात पै सचिन पवार यांचा जन्म झाला.त्यामुळे संतसेवेची तळमळ त्यांच्या रक्तातच आहे. त्याच तळमळीतून विविध धार्मिक उपक्रमामामध्ये पै सचिन पवार यांचा सहभाग असतो. विशेष म्हणजे हा सहभाग ते कृतिशीलपणे घेतात. जेवढी म्हणून शक्य आहे तेवढी मदत मोठ्या ताकतीने ते अशा उपक्रमामधें करत असतात.

सद्विचाराच्या सहवासात रमणारा हा सद्विचारी सामाजिक कार्यकर्ता असून अशाच विचाराच्या नेतृत्वाची गरज आता समाजाला आहे. शरीराने ताकदवान आणि हृदयाने कनवाळू असलेल्या पै सचिन पवार याना अशा कार्याचा, विचारांचा प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

  • उपक्रमाचे नाव:संत सेवा
  • संस्था:स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन, मल्हार प्रतिष्ठान
  • img
  • img

काही क्षणचित्रे