ध्यास वसुंधरा जपण्याचा..त्यासाठी निर्धार वृक्षसंवर्धनाचा...
ग्लोबल वॉर्मिंग संकट साऱ्या जगाचाच दरवाजा ठोठावत आहे. त्यामुळे सावध होणं काळाची गरज आहे. याच गरजेतून पै. सचिन पवार यांनी वृक्षरोपणाचं शिवधनुष्य पेललं. ज्याचा कोणाचा वाढदिवस आहे त्याला झाडाचे रोप भेट देण्याची अनोखी संकल्पना त्यांनी राबवण्याची सुरवात केली. आणि बघता बघता या उपक्रमातून आतापर्यंत तब्बल सहा हजार रोप भेट देण्यात अली आहेत. वाढदिवसाला मिळालेली ही अनोखी भेट जपण्याचे काम संबंधीतांकडून होते आणि त्या रोपाचे संवर्धन शंभर टक्के होते.
दररोज दहा बारा कितीही वाढदिवस असो त्या प्रत्येकाला घरी जाऊन ही अनोखी भेट देऊन वसुंधरा जपण्याचा ध्यास पै. सचिन बाबुराव पवार यांनी घेतला आहे. त्यांच्या या पर्यावरणप्रेमी अनोख्या उपक्रमाची दखल विविध मान्यवरांनी, वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी घेतली असून त्यातूनच त्यांच्या उपक्रमाचे महत्व लक्षात येते. यापुढील काळात पर्यावरणाचा हा उपक्रम अधिक व्यापक, गतिमान करण्याचा धृढ निर्धार आहे.
वाकड पोलीस स्टेशन च्या आवारात १५ ऑगस्ट २०१६ रोजी विविध प्रकारची १२५ झाड लावण्यात आली. आजच्या स्थितीत त्याची जोपासना पोलीस चौकीने चांगल्या प्रकारे केली.
- उपक्रमाचे नाव:एक झाड एक वाढदिवस
- संस्था:स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन, मल्हार प्रतिष्ठान




